“ सुमे, आकारे तुले पाहाले पावने आले, लवकर ये, झालं नाय का खेलनं-बिलनं? ” सुमीच्या मायनं अशीच हाक मारली होती. जेव्हा तिला बघायला पाहुणे आले होते. सुमीनं नुकताच चवदाव्या वर्षातून पंधराव्यात प्रवेश केला होता. त्या देखण्या, मित् भाषी, शांत सुमीला लग्न म्हणजे ढोल, ताशे, सनईच्या तालावर नाचणे आणि लोकांच्या प्रचंड उपस्थितीत पंच पक्क्वन्नाचा सोहळा पार पडणे व नवऱ्यासोबत सासरी जाणे यापलीकडे दूरपर्यंत थांग पत्ता नव्हता. ती अल्लड किशोरवयीन पोर आई बाबांच्या म्हणण्यानुसार लग्न बेडीत अडकणार होती. “ पोरगं पाहाले बेस हाये, धा एकर वावराचा मालक हाये आन् लाथ मारल तेथं पानी काढायची त्याच्यामंदी धमकही हाये, आमच्या सुमीचा आन् पोराचा जोडा संभू पार्वती सारखा सोभून दिसते. ” आई बाबांची पोराच्या पसंती विषयीची चर्चा सुमी चोरून ऐकत होती. आपले लग्न होणार या विचाराने सुमीच्या मनात आनंद संचारला होता. सुमी गोल गिरकी घेत बाहेर नाचत पळत सुटली. २४ मार्च १९८८ रोजी सुमीचे चार हात झाले. आता सुमी दिवाकरची अर्धांगीनी झाली होती. होतकरू, नव्या-नव्या युक्तीने पैसा कमविण्यास धडपडणारा दिवाकर आपले गाव सोडून