मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

ऐक जरा साजणे...



ऐक जरा साजणे ये जरा समीप ये 
दाव काळजास या लाघवी ते रुप ये 

संपला तो शोध अन संपली ही प्रतीक्षा 
उभय काळजास करू परस्परांनुरुप ये 

नव्या जगात जाऊया हात हाती घेऊनि 
नव्या नभी भरारण्या घेऊ चल झेप ये 

हव्याहव्याशा गडे कारावासाची सजा 
प्रीत गुन्ह्याची सदा भोगू जन्मठेप ये

कुठे हे जग पाहणे पून्हा जीवास लाभणे 
ह्या नव्या जगातला आनंद घेऊ खूप ये

-मनोज बोबडे (2005)

नजरेत तुझ्या

तुझ्या कायेतून।  चंदनाचा वास।  येताना उल्हास।  मनात या ।।  नजरेत तुझ्या।  ओलीचिंब माया।  बंधनाची रया।  फुलापरी।।  पिलासाठी जशी।  झुरतसे घार।...