आई आणि बाळ
लाडीक लाडीक बाळ हासती हर्षित आई मनी खास ती पाहून म्हणती राजा हा गोड सानुला माझा हा! रम्य खेळणे हाती घेणे हलवून झुलवून फेकून देणे मस्तीत रमती राजा हा गोड सानुला माझा हा! टकमक बघती नैन टीमुकले फुरफुर करती ओठ चिमुकले खेळ कैक करी राजा हा गोड सानुला माझा हा रंग सावळा सुंदर सुंदर चोर भामटा बडा बिलंदर जणू विदुषक राजा हा गोड सानुला माझा हा रडतची बघता गोड फुले ओठांवरती हास्य झुले फुलच होतो राजा हा गोड सानुला माझा हा मनोज बोबडे