पोस्ट्स

जून, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्हिलचेअर ’ चा हुंकार

कवी मनोज बोबडे यांचा व्हीलचेअर हा ६३ कवितांचा सुंदर संच आहे. ‘वत्स-विनायक प्रकाशन’ पुणे, नागपूर द्वारा तो प्रकाशात आला आहे. प्रख्यात चित्रकार श्री अरुण मोरघडे ह्यांनी मुखपृष्ठ साकारले आहे. खगोलीय ऋतुचक्री रंगाकृतीद्वारे ‘व्हीलचेअर’च्या पार्श्वभूमीवरील गती, व्याप्ती व विशाल जीवनार्थ प्रकट करणारा भव्य चित्राविष्कार आहे. हे आविष्करण आतील काव्यात्म आशयाला पूरक ठरले आहे. सोबतच या काव्यसंग्रहातील ५७व्या ‘मी जळावानी’ या कवितेतील चार ओळी अंकित करून आयुष्यरूपी वाहत्या नदीच्या जीवनात डबक्याप्रमाणे कुठेच साचून न राहता वाहत राहून ग्रंथातीत नैसर्गिक काव्यानंद अनुभवण्याचा संदेश देण्यात आला आहे. एकंदरीत मुखपृष्ठ ही वाचक रसिकांची आतील कविता वाचण्याची जिज्ञासा तीव्रतेने जागृत करते. मुखपृष्ठाप्रमाणे मलपृष्ठही खूप काही सांगून जाते. मलपृष्ठावरील कवी मनोज बोबडेंचे रंगीत छायाचित्र त्यांचे व्यक्तिमत्व प्रकट करते पण महत्वाचे म्हणजे महाकवी सुधाकर गायधनी व महान विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे ह्यांची व्हीलचेअर काव्यकलेबाबतची गौरवपर प्रशस्तीपत्रे आहेत. यामुळे वाचक रसिक हा कविता संग्रह वाचण्यास एकदम आतुर होतो आती