पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गावसूक्त: गावाशी जुळलेल्यांचा श्वासच जणू!

‘गावसुक्त’ वाचला आणि त्यावर लिहायचंच असं मनाने घेतलं. वाचल्यादिवसापासून त्यातील वैशिष्ट्य मला तसे करण्यासाठी सतत उद्युक्त करत राहिले. ते सांगायचे झाले तर या संग्रहातील प्रत्येक कडवे हे दुसऱ्याशी कडीप्रमाणे जुडलेले आहे. एक कडवे वाचले की, ते विचार करायला बाध्य करतेच. मग दुसरे मला वाच म्हणून खुणावत राहते. वाचीत जातो तसतसे मन रोमांचित होत जाते. चिंतानाधीन होत जाते. आणि आपण आपल्याच गावाच्या दुनयेत विहार करायला लागतो. हीच या ‘गावसूक्ताची’ खासियत आहे. त्यातील ओळनओळ मनस्पर्शी झाली आहे. पहिल्यापासून तर शेवटच्या ओळीपर्यंत साचेबद्ध असणारा हा ग्रंथ बाहेरून जेवढा सुंदर आहे, त्याहून कितीतरी पटीने तो आतून काव्यसौंदर्याने नटला आहे. गावाचं अस्सल आणि विदारक चित्रण करणारा तसेच मनाला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारा हा संग्रह सर्वच बाबतीत वैविध्यपूर्ण आहे. ही झाली ‘गावसूक्ताच्या’ कवितेतील काव्याची उजवेपणा. रचनेच्याही आगळेपणाविषयी आवर्जून बोलावे अशीच ती आहे. सर पावसाची येता लागे धरेला चाहूल आत धडपडे मुल. ही अष्टाक्षरी नव्हे, चारोळी पण नव्हे, अभंगही नव्हे, हायकू तर नव्हेच नव्हे. मग हा प्रकार आह

कॉम्रेड पानसरे

पानसरे तुम्ही। असे काय केले। जिवानीशी गेले। संपुनिया।। जगावया येथे। करुनिया तर्क। व्हावया सतर्क। शिकविले।। सर्वहारा वर्ग। आपला तू केला। संदेशही दिला। जगण्याचा।। जाती-धर्मातली। तेढ संपवाया। झिजला तू राया।आजीवन।। कोण तो शिवाजी। कसा नि कोणाचा। सांगून तू वाचा। फोडलीस।। अठरापगड़। जाती-जमातीचा। असा शिवाजीचा। इतिहास।। अशा ज्ञानामुळे। जात्यांधाचे हित। आल्याने गोत्यात। भांबावले।। आणि तू गोविंदा। दीनांच्या कारणे। केली आंदोलने। कितीतरी।। भांडवलदार। हेही तुझ्यावर। वाकड़ी नजर। ठेवलेले।। ह्या ह्या वृत्तिनेच। प्रकार आखुन। तुझे सुज्ञ प्राण। हिरावले।। सत्य, न्याय, सख्य। ह्यासाठी घातली। हयात सगळी। पानसरे।। परि नाही चिंता। एका बिजातून। हजारो उगुन। बीजे येती।। -मनोज स. बोबडे