तुझ्यामुळे


बाबा तुझ्यामुळे हे धन्य इमान झाले
तुझ्यामुळेच 'मानी' हे वर्तमान झाले

वर्जू कुणास आता हृदयी कुणास घेऊ
बालिश प्रश्न सारे माझे गुमान झाले

तरवार विवेकवादी तुझी अम्हा मिळाली
हाताळता तीयेशि पिळणे किमान झाले

मानव प्रेम आता परमोच्च मानतो मी
ते भेदभाव सारे कास्पटा  समान झाले

आम्हा थिटीच होती ती वितभर दुनिया
आता हे मालकीचे बघ आसमान झाले

मनोज बोबडे (व्हीलचेअर मधून)

टिप्पण्या

  1. आम्हा थिटीच होती ती वितभर दुनिया
    आता हे मालकीचे बघ आसमान झाले....

    ..व्वा मनोज दा या एका शेरामध्ये बाबासाहेबांची महानता विषद केलीयेस तू! क्या बात है!!!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हे असं आहे तर...

प्रबोधन गीत

शस्त्रक्रिया