रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'...... कहते हैं अगले ज़माने में कोई 'मीर' भी था ---मिर्झा गालिब
सोमवार, २७ जानेवारी, २०१४
बुधवार, २२ जानेवारी, २०१४
लक्षण विजय वीरांचे
नकोच धरणे इर्षा, मत्सर
पाहता यश इतरांचे
स्वतःस जिंकीत जाणे
हे लक्षण विजय वीरांचे ||
जिद् मुंगीची अंगी बाणून
गरुड नजर ती स्वतःस मानून
क्रमून कणकण अंतर खडतर
झिजवून काया सदा खरेतर
ध्येय गाठणे तयांचे ||
नसे कुणाशी तुलना आणिक
झपाटणे हे त्यांचे 'टॉनिक'
हवे मना ते धरण्यासाठी
मात स्वतःवर करण्यासाठी
धडपडणे ते करांचे ||
सदोदित ते मनास बोले
'तुझियासाठी अशक्य कुठले?
कर कर कर कर सुरुवात ती
जमेल तुजला हवी बात ती'
मंत्र-जाप हे शूरांचे ||
-मनोज बोबडे
पाहता यश इतरांचे
स्वतःस जिंकीत जाणे
हे लक्षण विजय वीरांचे ||
जिद् मुंगीची अंगी बाणून
गरुड नजर ती स्वतःस मानून
क्रमून कणकण अंतर खडतर
झिजवून काया सदा खरेतर
ध्येय गाठणे तयांचे ||
नसे कुणाशी तुलना आणिक
झपाटणे हे त्यांचे 'टॉनिक'
हवे मना ते धरण्यासाठी
मात स्वतःवर करण्यासाठी
धडपडणे ते करांचे ||
सदोदित ते मनास बोले
'तुझियासाठी अशक्य कुठले?
कर कर कर कर सुरुवात ती
जमेल तुजला हवी बात ती'
मंत्र-जाप हे शूरांचे ||
-मनोज बोबडे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
अतर्क्य परामानसी गुंतलेला
अतर्क्य परामानसी गुंतलेला कुठे राखतो न्याय तो बंधुतेला तयांला गमे धर्म उन्माद नीती सले साम्य त्याला, चळे गोड प्रिती ...
-
प्रतीकात्मक वैचारीकतेचा अभाव माणसाला गुलाम करतो! अतिशय श्रध्दाळु, धार्मिक आणि देववादी लोकांचा या गोष्टींवर विश्वास बस...
-
कविता मन संवेदनशील असलं की त्याची जाणीव चांगली असते म्हणूनच ते मन कुठलेही काम व्यवस्थित पार पाडत असते. कविता करणे हेही तशाच मनाचं काम आहे...
-
किती काळ तो साहणे द्वेष त्यांचा किती शब्द प्रमाण मानू तयांचा इथे भ्रष्ट मानव्यता ज्यांनि केली कसा मान राखू अशा देवतांचा ...
