पोस्ट्स

2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मक्तेदारी

विश्वास जयावर केला भारी त्याने केली हरामखोरी सोपविले ज्याच्यावर जीवन ते करते असली गद्दारी साम, दाम, भेदावर मेले लुटू लागले जनता सारी शब्दाच्या खेळावर नुसते सुंदरता करते बाजारी धर्माच्या नावावर निव्वळ भारतास केले आजारी जिंकाविती साधारण कोणी हीत रक्षति अपुले भारी मानवतेचा लेश न पुरता अशी कशी ही मक्तेदारी -मनोज बोबडे

सांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”

इमेज
जागतिकीकरणामुळे माणसाचे जीवन अत्यंत गतिशील झाले आहे.समाज सातत्याने बदलत असतो, हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेची झालर भालावर बांधून, माणूस शाश्वत मूल्यांना मुठमाती देण्यात धन्यता मानतो. मानवी मनाचं उद्ध्वस्तीकरण प्रत्येकाच्या नजरेत सलत आहे. समाजाच्या स्तरिकरणाचा विचार केल्यास उच्च स्तराद्वारे निम्न स्तराचे शोषण होत आहे. उपेक्षितांच्या, वंचितांच्या जाणिवा चित्रकाराच्या कुंचल्याने लेणीरूप होतात तर कवीच्या शब्दाने महाकाव्य! ज्यांनी आयुष्याला तप्त तव्यावर शेकले असेल त्यांचा कलात्मक आविष्कार ‘आम आदमी’च्या संवेदनेचं प्रातिनिधिक रूप असत. उपरोक्त संदर्भात तादात्म साधेल असे समकालीन व्यवस्थाचित्र नाविन्यपूर्ण व समृध्द भाषाशैलीने कवी ‘किशोर मुगल’ यांनी ‘दिवस निरुत्तर येतो’ या कवितासंग्रहात अभिव्यक्त केले आहे.    कवी ‘किशोर मुगल’ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले एक ‘चंद्रपुरी गझलकार’आहेत. ’एकावन्न कविता माझ्याही’ हा त्यांचा पूर्वप्रकाशित कवितासंग्रह! ’मराठी माय बोली’ कवितेच्या कार्यक्रमाचे एक सभासद. अलिकडेच ९ व्या मराठा साहित्य संमेलनात[चंद्रपूर] संमेलनाध्यक्ष बाबा भा

कर्म

तो गेला पाठीवर पंप घेऊन शेतातील धान्य-कडधान्यांवरील किड्यांचा-अड्यांचा नायनाट करण्यासाठी... म्हणूनच त्याच्या स्वतःच्या उदरभरणासमवेत जगताचंही भरण-पोषण होत असते ...त्याच्याच बळावर आपल्या उदराचा आकार वाढवून पाप-पुण्यविषयक प्रवचन देणारे अहिंसक(?) धर्मज्ञ यांना कोणत्या पापयोनीची जागा दाखवतील? ...त्याचं हे धर्म कार्य म्हणून घोषणा करतील तर मग स्वतःच्या दुटप्पी वागण्या-बोलण्याची सजा म्हणून कोणते नरकस्थान सांगतील?  -मनोज बोबडे

आईचे विश्व

बघ बघ बाळा वाजे खूळ-खुळा असा नको हसू गोड-गोड दिसू लागेल नजर माझीच सत्वर टिळा काळा काळा गालाला लावला मिरची जाळली नजर पळाली -आईचाच भ्रम भ्रमासाठी श्रम नसले ते काही करतच राही जग कल्पनेचे उभे करायाचे असली ती आई विश्व सुख घेई -मनोज बोबडे

शक्तीस....

गुंतला गुंतला | तुझ्यामध्ये जीव | अवांतर हाव | निवर्तली || तुझ्या अभावाने | उरातले उर | सलतसे फार | रात्रंदिन || वाळवंटा घरी | जळाचा अभाव | तसा माझा जीव | तुझ्याभावी || प्राणहीन देह | आणि शक्तीहीन | यासाठी प्रमाण | पुतळा तो || माझे निम्मे जिणे | चालले सतत | जशी देहगत | पाषाणाची || -मनोज बोबडे

गझल

शोधून सार पाहिले ते दार-दार पाहिले कित्त्येक माणसास रे मी थंडगार पाहिले रे वंद्य तुझे दिव्य ते फ़क़्त पुस्तकामध्ये वागताना सामोरी किती विखार पाहिले जेत्यास येथल्या कुणी विचारती, ना पाहती मात झालेल्याच मी गळ्यात हार पाहिले ना कोणत्याच राहिला तो स्नेहभाव मानसी फ़क़्त द्वेषाचेच येथे आरमार पाहिले आभाळ भाळ रंगले, त्या तेज तारकांमुळे हा भास- 'त्याच' शोधकाने आरपार पाहिले (त्याच=खगोलशास्त्री, संशोधक) गे बाळगू कशास मी, हे वेदने, तमा तुझी! पाषाण हृदयीच मी आजार फार पाहिले -मनोज बोबडे