पोस्ट्स

एप्रिल, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शक्तीस....

गुंतला गुंतला | तुझ्यामध्ये जीव | अवांतर हाव | निवर्तली || तुझ्या अभावाने | उरातले उर | सलतसे फार | रात्रंदिन || वाळवंटा घरी | जळाचा अभाव | तसा माझा जीव | तुझ्याभावी || प्राणहीन देह | आणि शक्तीहीन | यासाठी प्रमाण | पुतळा तो || माझे निम्मे जिणे | चालले सतत | जशी देहगत | पाषाणाची || -मनोज बोबडे