पोस्ट्स

डिसेंबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाऊलखुणा

माझ्या वेशितले ढग जाम पळवितो वारा तुझ्या गावात ग सखे आज पावसाच्या धारा गार पावसाच्या सरी तुझ्या गावात पडती गंध मातीतले वास अश्रू आमचे ढाळती सुक्या ढेकुळात जीव आज कोंडून मरती शिवारात गावकूस तुझ्या जळात झुरती तुझ्या वागण्याची रीत शुभ पाउलाच्या खुणा आज कळेल आम्हाला जेव्हा पेटेल वणवा आता रंग आभाळाचे माझ्या नयनात दाटे तुझ्या नसण्याचे नभ माझ्या डोळ्यात ओथंबे माझ्या संचितात रित्या कोण कोरेल अक्षर गाववेशीत शोधतो ओल्या पावसाची सर् किशोर कवठे 

चालतो वाट तो मी...

असा स्थिरतेने गडे राहतो मी परी चालतो चालतो वाट तो मी मला नाव सांगू नको तू उन्हाचे गडे सावलीला पुरा जाणतो मी तुम्ही देवतांना पूजा सर्वकाळी सदा माणसांच्या तळी नांदतो मी तसे पिळताना तुम्हा खंत नव्हती इथे काळजाना सकळ सांधतो मी मिळव तू परीने तुझ्या झेपते ते सये कुवतीने शिधा रांधतो मी पुरुष मी म्हणुनी कसा गर्व राखू करी बळ तुझ्याही असे मानतो मी कशाला कुणाशी फुका दोष द्यावा परी शोषकांचा पिळीन कान तो मी मनोज बोबडे 

तुझ्यामुळे

इमेज
बाबा तुझ्यामुळे हे धन्य इमान झाले तुझ्यामुळेच 'मानी' हे वर्तमान झाले वर्जू कुणास आता हृदयी कुणास घेऊ बालिश प्रश्न सारे माझे गुमान झाले तरवार विवेकवादी तुझी अम्हा मिळाली हाताळता तीयेशि पिळणे किमान झाले मानव प्रेम आता परमोच्च मानतो मी ते भेदभाव सारे कास्पटा  समान झाले आम्हा थिटीच होती ती वितभर दुनिया आता हे मालकीचे बघ आसमान झाले मनोज बोबडे (व्हीलचेअर मधून)