मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

विजय



मातेच्या टेकून ताठ शीर चरणाशी
निघे वीर जय संपादन करण्याशी

ते लक्ष्य एकले उरात घेऊन जाता
रांगडा धुमाकूळ रणात माजला होता

त्या समर वीराने दश शकले पाडून
हद्दी फडकीला निशाण तो गाडून

जय-अभिमाने फुगून आली छाती
अन् प्रिय आईची मस्तकी लावली माती

त्या वीर कृतीने विजयी झाला देश
जनतेत अन् सुटले ईश पूजण्या आदेश

प्रारब्ध कुणी, कुणी म्हणती सुकृत याशी
नच वावच इथल्या मिळतो सत्कार्माशी!

मनोज बोबडे (‘परिमळ’ या कवितासंग्रहातून)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विचारधन

  'धर्माविना विज्ञान पांगळे आहे आणि विज्ञानाविना धर्म आंधळा आइन्स्टाईनचे उद्धृत फार उत्साहाने अनेकवार ऐकवले जाते; पण आइन्स्टाईनने हेही स...