विचारधन २
धर्म
...धर्माला घरापुरते
मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाला संपूर्ण
स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय गाठण्यावर धर्माचा काही परिणाम होत नाही. आजकाल
संपूर्ण स्वातंत्र्याचे उपासक असलेले सदगृहस्थ धर्माला बौद्धिक गुलामी म्हणतात.
त्यांचे असे म्हणणे आहे की, “ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे.
मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे. असे मुलांना सतत सांगणे म्हणजे
मुलांना कायम स्वरूपी कमकुवत बनविणे होय. त्यांची मानसिक शक्ती आणि त्यांचा आत्मविश्वासच
कमकुवत बनविणे आहे.....
(शहीद
भगत सिंह समग्र वाड्मय. पृ. २०७)
आत्म्याचे अमरत्व
...अमरात्वावर ज्यांचा
विश्वास आहे असा एखादा माणूस जर तुम्हाला भेटला तर मग तुमची कोणतीच इच्छा अपुरी
राहणार नाही. हे नक्की समजा, की तुम्ही त्याच्या सर्वच वस्तू घेऊ शकता-अगदी
तुम्हाला वाटले तर तुम्ही जिवंतपणी त्याची कातडीही सोलून घेऊ शकता. आणि तो ती
तुम्हाला देण्यास आनंदाने तयार होईल....
(अप्टन सिंक्लेयर ४०३ सी.
जी.)
ईश्वर
...परमेश्वराने हे दुःखाने
भरलेले जग का निर्माण केले? केवळ तमाशा बघण्यासाठी? असे असेल तर मग तो क्रूर
सम्राट निरोपेक्षाही भयंकर जुलमी आहे. हा काय त्याचा चमत्कार असावा? पण असल्या
चमत्कारी ईश्वराची गरज काय आहे?.....स्वार्थी लोकांनी, भांडवलदारांनी धर्माला
नेहमीच स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वापरून घेतले आहे. इतिहास याला साक्ष आहे. ‘धीर
धरा!’ आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा! असे सांगणाऱ्या तत्वज्ञानाने ज्या यातना
दिल्या आहेत, ते सर्वच जण जाणतात.
लोक म्हणतात, की परमेश्वराचे अस्तित्वच जर नाकारले तर काय होईल?
जगात पापे वाढतील, अंधाधुंदी माजेल परंतु अराज्यवादी म्हणतात, की त्यावेळी माणूस
स्वतःच एवढा उत्तुंग झालेला असेल, की स्वर्गाची लालूच व नरकाचे भय न दाखवताही तो
दुष्कृत्यापासून दूर राहिल. आणि प्रामाणिकपणाने कार्य करेल! तो एकदा स्वतंत्र
झाला, तर त्याचे जीवन फारच उन्नत होईल....
(शहीद भागत सिंह समग्र वाड्मय. पृ.
२४४-२५६)
मिथके
...सत्ये दोन प्रकारची
असतात, अशी माझी भूमिका आहे. एक सत्य विज्ञान, इतिहास वगैरेंच्या कसोटीवर घासून
पाहायचे असते, त्याची तार्किक चिकित्सा करायची असते. याउलट एक सत्य तर्काच्या
कसोटीवर पाहायचे असते. त्याला भावना आणि श्रद्धा यांचे अधिष्ठान असते. केवळ
वैज्ञानिक सत्य माणसाच्या सर्व गरजा भागवू शकत नाही. माणूस केवळ तर्कावर जगणारा
प्राणी नाही. त्याला काही वेगळ्या गोष्टींचीही आवश्यकता असते. आणि ती पूर्ण
करण्याचे काम चांगली मिथके करतात....
मिथके ही शोषण, अन्याय, अद्न्यान इ. गोष्टींचा प्रसार करीत असतील,
तर ती नाकारलीच पाहिजेत. परंतु ज्या मिथकांना अशा प्रकारचा डाग लागलेला नसतो, जी
उत्कट भावनात्मक आनंद देतात, मानवी मनाला उन्नत करतात ती मिथके नाकारण्याचे कारण
नाही....
(सर्वोत्तम भूमिपुत्र: आक्षेप ले.
डॉ. आ. ह. साळुंखे)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा