विचारधन

....ही आपली खूप मोठी चुक आहे की, धर्माला आपण नैतिकतेचा समानार्थी करून बसलो, या पूर्णतः भिन्न मान्यता असूनही! धर्म हा आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक, ईश्वर, अवतार, यज्ञ, कर्मकांड, पाप-पुण्य, स्पृश्य-अस्पृश्य आदि ज्या धारणा आहेत त्यावर अवलंबून आहे. आणि नैतिकता ही सत्य आणि प्रेम यावर आधारित आहे. ज्याचे उद्दिष्ट समाजात प्रामाणिकता, कर्तव्यपरायणता, सहानुभूती, करूणा, बंधुता, सभ्यता, नागरिकता, देशप्रेम, विश्वबंधुत्व, न्याय, शिष्टाचार इत्यादींच्या मार्फत समाजात शांती, सुव्यवस्था आणि सद्भावना प्रस्थापित करून विज्ञान, कला आणि साहित्याची सेवा करत मानव जातीस सुखी, समृध्द व समाधानी करणे आहे.....नैतिकतेचे दुसरे नाव मानवता हे आहे!

(प्रयागद्त्त पंत, ‘धर्म बनाम नैतिकता’, सरिता, (११)१९७१/पृष्ठ ७३) चा मराठी अनुवाद.....


............देशाच्या भूतकाळातून वर्तमान प्रभावित झाल्याशिवाय राहूच शकत नाही, आणि वर्तमान भविष्याला प्रभावित केल्याशिवाय सोडत नाही.
      हिंदूंच्या अभिजन वर्गाची इतिहासाप्रती वेगळ्याच (अजीब) प्रकारची धारणा राहिलेली आहे. ते नेहमीच इतिहासाला आहे त्याहून निराळ्या रुपात पुढे आणत असतात. ते काळ्या भूतकाळाला चुन्याचा लेप लावून पांढरे करत असतात. आणि याला खरा, प्रामाणिक इतिहास समजल्या जावा अशी अपेक्षा करतात. त्यामागे तीच हीन भावना काम करते, जी त्यांच्यामध्ये विद्यमान असते. ती ज्या माणसात असते, त्यांच्यामध्ये विशिष्ट दोष असतात. ज्यांचा वारसा कवडीचाही अभिमान करण्या योग्य नसतो.
      आमचा इतिहास पराजयाची लंबी रांगच म्हणता येईल. जे लोक आपआपल्या देशात अकाली संकटामुळे मरायला टेकले होते, जे आपआपल्या देशातून हाकलून लावल्या गेले होते, ते येथे येऊन मोठ-मोठे साम्राज्य स्थापण करण्यात यशस्वी झाले...


(डॉ.सुरेंद्र शर्मा ‘अज्ञात’...हिंदू इतिहास:हारो की दास्तान पृ.५) चा मराठी अनुवाद.

............कपिलमुनीच्या तत्वज्ञानातील बुद्धाने ग्राह्य मानलेली तीन तत्वे:-
 अ) विचार विवेकावर आधारित असावा.
 आ) ईश्वराचे अस्तित्व आहे आणि ईश्वर या सृष्टीचा निर्माता आहे. या गृहीताला तार्किक किंवा यथार्थाचा आधार नाही.
 इ) या जगात दु:खाचे अस्तित्व आहे.
.....आणि हे बुद्धाच्या तत्वज्ञानातील खालील निवडक तत्व विचार.
.....१) विचार स्वातंत्र्य हेच सत्याचा शोध घेण्याचा एकमेव मार्ग होय.
.....२) आत्म्यावर कोणत्याही कर्माचा प्रभाव पडत नाही.
.....३) सुद्न्य माणूस दुसऱ्यावर आश्रित होऊन कोणत्याही तत्वाचा स्वीकार करणार नाही.
.....४) काही असे म्हणतात, ‘ईश्वर उत्पत्तीचे निमित्त आहे.’ जर असे आहे तर चेतन आत्म्याच्या   प्रयासरत होण्याला काय अर्थ आहे? जो सृष्टीला गती प्रदान करतो, तोच सृष्टीची गतीही अवरुद्ध करणार!
.....५) मनुष्यप्राणी निरंतर परिवर्तनशील आहे. निरंतर संवर्धनशील आहे. आपल्या जीवनात कोणत्याही दोन क्षणी तो तोच असत नाही, असूही शकत नाही.
.....६) सर्व वस्तूंच्या अनित्य अशा प्रवृत्तीवरच इतर सर्व वस्तूंच्या अस्तित्वाची शक्यता अवलंबून आहे.
.....७) अस्तित्ववादाच्या सिद्धान्ताचा बोध सोपा आहे. सरळ आहे. कोणत्याही वस्तुन्प्रती आसक्ती बाळगू नये एवढेच!
.....८) विश्वाची नैतिक व्यवस्था कुशल असेल किंवा अकुशल असेल, परंतु ही व्यवस्था मानवाधारित आहे. अन्य कोणावरही आधारित नाही.
.....९) मानव मुक्त नसेल तर त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? पराप्राकृर्तीक कारणांवर त्याची श्रद्धा असेल तर त्याच्या बुद्धिवंत होण्याचे प्रयोजन काय?
.....१०) जे काही श्रवण करण्यास मिळाले एवढ्याच कारणास्तव ते स्वीकारू नये.--कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसऱ्याकडे आली एवढ्याच कारणास्तव स्वीकार्य ठरू नये.--धर्मग्रंथात एखादी बाब लिहिली आहे एवढ्याच कारणाने ती स्वीकारू नये.--एखादी बाब श्रेष्ठ आचार्यांनी किंवा संन्याशांनी कथन केली एवढ्याच कारणावरून ती स्वीकारू नये.--मान्य श्रद्धा किंवा विश्वासाच्या आधारावरच कोणतीही बाब स्वीकारू नये. आदी.


(बुद्ध आणि त्याचा धम्म: ले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर)










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रबोधन गीत

ऐक जरा साजणे...

हे असं आहे तर...