ऐक जरा साजणे...ऐक जरा साजणे ये जरा समीप ये 
दाव काळजास या लाघवी ते रुप ये 

संपला शोध अन संपली ही प्रतीक्षा 
उभय काळजास करू परस्परांनुरुप ये 

नव्या जगी जाऊया हात हाती घेऊनि 
नव्या नभी भरारण्या घेऊ चल झेप ये 

हव्याहव्याशा गडे कारावासाची सजा 
प्रीत गुन्ह्याची सदा भोगू जन्मठेप ये

कुठे हे जग पाहणे पून्हा जीवास लाभणे 
ह्या नव्या जगातला आनंद घेऊ खूप ये

-मनोज बोबडे (2005)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझ्यामुळे

प्रबोधन गीत