हीच खरी नीती ....


मती-नीती-गती-वित्त गेले विद्येविना
दिला मंत्र ज्योतीबाने मतलबाविना

तयासाठी कुणाच्याही मुखी नाही गाणी
जयामुळे झाला हरजीव स्वाभिमानी

भेदाभेद प्रस्थापित करी त्याचा मान
ठेवी, करी मेंदूतील ज्ञानाचे पतन

ज्योतीबास राष्ट्रद्रोही म्हणतात ‘भिडे’
असे वळवळ करी ‘मनोहर?’ किडे

त्यांचे इथे शब्द ज्यांनी प्रमाण मानिले
मेंदू-मने सारे त्यांचे रसातळी गेले

अशा गुरुजना काय मान-पान द्यावा?
आदरास त्यांच्या एक पुरे ती खडावा 

नीती अशी भ्रष्ट, बडेजाव श्रेष्ठतेचा 
म्हणे 'द्रोही' त्यांना, सत्य ज्ञान सांगे वेचा!

अशा नरा माराव्यात पैजारा अनेक 
अरे गड्या हीच खरी नीती आहे नेक! 

-मनोज बोबडे (डिसेम्बर२००७)

¼आज ११ एप्रिल क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्या निमित्य विनम्र अभिवादन! त्या निमित्यानेच ही एक कविता½

टिप्पण्या

  1. bhau....bhide baddal tipani kelit..
    ya maage kshanik rajakiy bhaavatun ki
    purvgrahatun?
    bhide yaanaa koni aatirekachy a dveshane dushane det aasatil tevha tyanchya vichar dharechya samuhane kay karave ?
    purogami lok dhikhau purogamyanche bahule
    bhasatat tevha samany lokaani kay karayache?

    उत्तर द्याहटवा
  2. जे भिडे महात्मा फुल्यांविषयी कमालीचे द्वेष्टे आहेत. जे फुल्यांना राष्ट्रद्रोही समजतात. तसेच अवैज्ञानिक बाबींचा प्रसार करून तरुणांची माथी भडकवतात त्यांच्याविषयी तुम्हाला एवढा आदर का वाटावा? मी व्यक्तिशः त्यांचा द्वेष करत नाही पण जेव्हा भिडे जाहीरपणे समाज हितदर्शी फुल्यांना राष्ट्रद्रोही संबोधतात तेव्हा ते मानास पात्र राहत नाही.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रबोधन गीत

ऐक जरा साजणे...

हे असं आहे तर...