सोमवार, १४ जुलै, २०२५

दुसऱ्या हृदयाची प्रतीक्षा !


शोधात


माझ्या मनाशी संवाद साधणाऱ्या

पुन्हा एका मनाच्या शोधात आहे मी

आस्तिकता नास्तिकता

या दोहोंच्या पलिकडे घेऊन जाणारं मन

जिथ असेल निर्भयता, निश्चिंतपणा, धिरच-धिर

असेल माझं हरवलेलं

गवसुन पाऱ्याप्रमाणे

निसटत जाणारं निरागस बालपण

त्या बालपणाला सावरणारे हात

मायेनं जोपासणारे

ममतेनं गोंजारणारे


जिथं नसेल कसलाही पक्षपात

नसेल जन्म, नसेल मृत्यु...

असेल एक चैतन्यमय आविष्कार प्रेमाचा!

आणि, आणि माझ्या मीपणाला

हरवून लावणारा मुक्त आनंद

निर्मळ, निराकार!

नोक तुटल्या काट्यांनी जीवन विस्कटून टाकणाऱ्या

मनाची संगत नकोय मला

नकोय ते, ज्याला सिमेची झालर पसंत आहे.


मी त्या मनाच्या शोधात आहे,

जे मला मिळवून देईल माझं असलेलं साम्राज्य,

जे देईल मुक्तपणाचं असिम प्रेम

जे माझं होऊन राहिल नित्यासाठी,

  त्या मनाच्या शोधात आहे मी !


तुम्हा कुणाला गवसेल तर, सांगा मला...


माझा पत्ता...

निष्क्रिय देहाच्या छातीत

सळायला लागलेलं गाव आहे मनाचं,

तेच ते!


-मनोज बोबडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दुसऱ्या हृदयाची प्रतीक्षा !

शोधात माझ्या मनाशी संवाद साधणाऱ्या पुन्हा एका मनाच्या शोधात आहे मी आस्तिकता नास्तिकता या दोहोंच्या पलिकडे घेऊन जाणारं मन जिथ असेल निर्भयता, ...