मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

गझल

 


जवळीक  


अशीच जवळीक नांदो ही जगताची माझी 

कधी न तूटावी नाती मानवतेची माझी 


आयुष्याला कितीक पुन्हा मी कवटाळू 

सैल जराशी व्हावी मिठी त्याची माझी


उन्हामुळेच असा इथे घाबरलो विरलो 

सलगी कधी ना जमली ही छायेची माझी 


खरेच का तुज कळली नाही प्रीत मनाची 

मग ती भाषा कसली तव नयनाची माझी 


अंतरातुनी किती ईशाला आळवले मी 

कधीच प्रीती जुळली ना देवाची माझी


सखे सोडला नाद खुळा मी परमेशाचा 

गट्टी होते आहे नास्तिकतेची माझी


-मनोज बोबडे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्लोक

  किती काळ तो साहणे द्वेष त्यांचा किती शब्द प्रमाण मानू तयांचा इथे भ्रष्ट मानव्यता ज्यांनि केली कसा मान राखू अशा देवतांचा              कुण...