शनिवार, ७ जानेवारी, २०१२

माशी


रडू नको गीडू नको
बाई तू अशी
अग् तुझ्या नाकावर
बसली माशी

रडशील तर ती
चावेल तुला
थांब तशीच अग्
पकडू तिला

माशी मारायला मी
मुठ बांधली
बुक्की मारता ती माशी
उडून गेली

हाताची या बुक्की तुला
फार लागली
नाकातली अळी धाऊन
बाहेर आली

आणि अळी सर्रकन
ओढवली आत
दिसू नये म्हणून नाकी
ठेवला तू हात

झाली बघ बाळा अशी
माशीची या मात
अन् दिसू लागे तुझे
पांढरे ते दात

मनोज बोबडे  

1 टिप्पणी:

  1. बालगीत लिहायला मोठ तरुण हृदय लागतं मनोजराव, नाहीतर आम्ही मोठे व्हायच्या आधीच म्हातारे होऊन बसलोय!

    ~गणेश

    उत्तर द्याहटवा

विचारधन

- नैसर्गिक घटकांचे स्पष्टीकरण प्रयोजन कारणे लागू करून देण्याचा प्रयत्न केल्याने विज्ञानास घातक वळण लागते. नैसर्गिक घटकांमागे काही उद्दिष्ट अ...