![]() |
प्रतीकात्मक इमेज |
प्रश्न
केली कोणी सांगा? मराठीची दैना l
प्रश्न हा जाईना, मनातूनी ll
बालकाचे मन, रमावयासाठी l
असे द्यावे पाठी, ओझे त्याच्या ll
शाळेला प्रथम, सांभाळावे जरा l
मग धडा खरा, शिकवावा ll
मातृभाषेलाच, आधी ते प्राधान्य l
मग भाषा अन्य, सांभाळावी ll
-मनोज बोबडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा