कुसुमास भाव मोठा
गंधास ना कहाणी
पद्यच श्रेष्ठ जेथे
काव्यास कोण मानी?
कृत्रिमता कशी ही
नांदावयास पाहे
टरफले हासती अन्
गाभा झुरून राहे
प्रतिभा उणी कशी ही
वाहे वेड्याप्रमाणे
कीर्तीस हपापल्यांचे
असती कैक बहाणे
-मनोज बोबडे ('परिमळ' या कविता संगहातून)
रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'...... कहते हैं अगले ज़माने में कोई 'मीर' भी था ---मिर्झा गालिब
किती काळ तो साहणे द्वेष त्यांचा किती शब्द प्रमाण मानू तयांचा इथे भ्रष्ट मानव्यता ज्यांनि केली कसा मान राखू अशा देवतांचा कुण...