हसू
तू अशी गोड हसतेस आणि
माझ्या मनाच्या रुक्ष खोडाला
जीवनाची कोवळी,
मनभावन पालवी फुटू लागते.
फुलते निर्भ्रांत होऊन,
बहरते जगण्याच्या उत्कट सदिच्छेने
लगडतात त्याला फळे
रक्तातील रोमांच वाढविणाऱ्या जीवनदायी रसायनाची...
फळातील बीजे पेरत जातात
उल्हास, उमेद, उत्साह वगैरे
तेव्हा तयार होत असतात रोमारोमात
पर्यावरणीय व्यवस्थेचे संदर्भ..
सर्वत्र जीवन उगण्यासाठी!
मग तूच सांग,
तुझ्या हसण्याचे झाड
एवढे असरदार असेल
तर तू मनःपूर्वकपणे
खळखळून हसायला नको का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा