पोस्ट्स

एप्रिल, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हीच खरी नीती ....

इमेज
मती-नीती-गती-वित्त गेले विद्येविना दिला मंत्र ज्योतीबाने मतलबाविना तयासाठी कुणाच्याही मुखी नाही गाणी जयामुळे झाला हरजीव स्वाभिमानी भेदाभेद प्रस्थापित करी त्याचा मान ठेवी, करी मेंदूतील ज्ञानाचे पतन ज्योतीबास राष्ट्रद्रोही म्हणतात ‘भिडे’ असे वळवळ करी ‘मनोहर?’ किडे त्यांचे इथे शब्द ज्यांनी प्रमाण मानिले मेंदू-मने सारे त्यांचे रसातळी गेले अशा गुरुजना काय मान-पान द्यावा? आदरास त्यांच्या एक पुरे ती खडावा  नीती अशी भ्रष्ट , बडेजाव श्रेष्ठतेचा   म्हणे ' द्रोही ' त्यांना , सत्य ज्ञान सांगे वेचा! अशा नरा माराव्यात पैजारा अनेक   अरे गड्या हीच खरी नीती आहे नेक!   -मनोज बोबडे (डिसेम्बर२००७) ¼ आज ११ एप्रिल क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्या निमित्य विनम्र अभिवादन! त्या निमित्यानेच ही एक कविता ½