मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

सगळेच मनाचे साथी


सगळेच मनाचे साथी
मी कुणास ठेऊ नावे
मज उगा दोष दे त्यांना
मी कशास शोषित जावे

ते गावे गातच जावे
समतेचे गीते सुहाणे
प्रेमाची फेड प्रेमाने
नच मोल ठेवती नाणे

ही भोगून घ्यावी सारी
सुख-दुःखे आळीपाळी
सप्रेमच जगणे आहे
दुनियेची तऱ्हा निराळी

हिरवळ नात्यची अन्
सुमनापारी मैत्री गोड
दरवळेल जपता सारा
हर्षाचा गंध अजोड

मिठास रसनेला ती
अंतरात मद भरलेला
तू अशा  नीती साठी रे
हा कशास देह झीजविला

न्यायाची धरणे बुज
साहणे न अन्यायाला
समतेचे देणे घेणे
हे सौख्यच दे हृदयाला

तू ये हृदयाशी माझ्या
कर बातचीत स्नेहाची
भरभरून देऊ प्रीती
करू दुनिया मानवतेची

           मनोज बोबडे 



शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

कारण कळले की भीती उरत नाही....


      ‘जिथे भयं आहे, तिथे लय आहे.’ हे तर मराठीतल्या म्हणीप्रमाणे वाक्य तयार झालेय. काही का असेना पण सत्य आहे, हे महत्वाचं. भयामुळे माणसाचे अपरिमित् नुकसान होत असते, मग ते कोणत्याही प्रकारचे का असेना, ते होत असते हा प्रत्येक जीवाचा परखड असा अनुभव असतो. हे कोणतीही प्रामाणिक व्यक्ती नाकबूल करणार नाही. भीती ही कोणत्याही स्वरुपाची असू शकते. ‘अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वा झाल्यामुळे वाटणारी परीक्षेची भीती.’ अवांतर संपत्ती घरी बाळगल्यामुळे चोरांची वाटणारी काल्पनिक भीती.’ दोरीला साप समजल्यामुळे वाटणारे भ्रमात्मक भय.’ ‘अंधाराचे भय वाटणे.’ ‘ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवल्याने भुताचे भय वाटणे.’ इ. प्रकारचे भय माणसाला नुकसानदायकच ठरत असते. या भयाने होणारा विनाश आपल्याला प्रत्यक्ष् जाणवत नसला तरी अप्रत्यक्षपणे आपला प्रभाव गाजवीतच असतो. हृदयाच्या नसांना कमजोर करत कोणत्याही बाबींवरील उपचारासाठी राबणाऱ्या विचारांना लुळे करण्याचे सगळे श्रेय ही भीतीच घेऊन जात असते. म्हणूनच तिच्या परिणामाची कल्पना असणाऱ्यांनी तीविषयी तारतम्य बाळगलेले कधीही चांगले. भीती वाटणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ती वाटली असता तिचा आपल्यावरील अंमल दृढ होऊ देऊन तिच्या अधीन होणे हे बरे नव्हे! माणसाला जेव्हा भीती वाटत असते तेव्हा त्यानं तटस्थ राहण्याची तयारी ठेवली पाहिजे जेणेकरून वाटणाऱ्या भीतीच्या कारणांचा शोध लावण्याचे बळ त्याला प्राप्त होईल! त्यानं जर त्या कारणांचा शोध न लावता त्याप्रती अनभिज्ञ राहिला तर ती त्याचा तर घात करेलच, तसेच तिच्याशी संबध येणाऱ्या अन्य मंडळीचाही नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शक्यतोवर भीतीला न भीता तिच्या तळापर्यंत जाऊन छडा लावणे हेच शहाणपणाचे, असे मला वाटते.
      आपण जरा भूताच्याच भीती विषयी बघुया! भारतात तसेच जगातही भूताची प्रचंड भीती बाडगणारे लोक राहतात. परंतु भूत म्हणजे भ्रम असल्याचे जगातील सर्वच तटस्थ शास्त्रज्ञांचे मत आहे. तरीही या भ्रमाची भीती बडगताना लोक दिसतातच. हा सर्व प्रभाव असतो आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांचा, सभोवतालील परिस्थितीचा, आणि मित्र मंडळीतील चर्चेचा, कारण प्रत्यक्ष शोध घेतल्यानंतर कळते की, शेकडा नव्याण्णवांनी भूत बघितेलेच नसते. आणि जो कुणी एखादा भूत बघणारा असतो तो ऐकाणारांची मने उत्तेजित होईस्तोवर त्या प्रसंगाला तिखट-मिठाच्या फोडणीने खमंग करत असतो. मग भूताला आपल्या लेखी काही किंमत नसणाराही असले किस्से ऐकून ते सत्य असल्याचे मानू लागतो. त्यालाही रात्री कुठे जाणण्याचा प्रसंग येतो. आणि भुते ही रात्रीच दिसतात ही मान्यताही असते. सोबत असते ती भिण्यास प्रवृत्त करणारी भयंकर अंधारी रात्र. तसेच मित्रांनी ते सांगितलेले किस्से अश्या वेळी आठवणं. या इत्यादी बाबींमुळे भूतांमध्ये तथ्य असल्याचे जाणवायला लागते. म्हणून प्रत्यक्ष भूत न बघाणरेही आहे म्हणणाऱ्यांची बाजू घेतांना दिसतात. कारण 'हिप्नोटीझम' या प्रकाराचा मनावर अंमल असतो. असो!
      भीतीचे कारण कळले की भीती उरत नाही ही जाण देणारा मी अनुभवलेला एक प्रसंग सांगतो....तो आहे भूताविषयीचाच...एकदा वणीवरून राजूराला परतताना रात्र झालेली. आम्ही ‘ओमनी’ या गाडीतून सहा-सात जण असू, येत होतो. त्या वेळी रात्रीचे दोन वाजले होते. म्हणून मध्ये पडणाऱ्या भालर या गावी मुक्कामाच्या इराद्याने निघालो. भालर दोन-चार कि.मी. असेल, त्या आधी मी दोन-चारशे मीटर अंतरावरून एक भूत बघितलं. ती होती एका छोट्याशा पुलाजवळ पांढऱ्या साडीत हसत उभी असलेली एक ‘हडळ’, आपल्याकडे तिला बोलीत ‘लावडीन’ असे म्हणतात.    
     भूताविषयीची श्रद्धा माझ्या मनातून केव्हाचीच हद्दपार झालेली असतानाही प्रथमतः ते बघून मी प्रचंड घाबरलो, पण लगेच भूत नसते ही समज जेव्हा जागली तेव्हा मी ठरवले, बघुया ही हडळ काय असते ती! म्हणून मी सोबत असणाऱ्या कुणालाच त्याविषयी सांगितले नाही. मी एकटक तिच्याकडे बघत राहिलो. जस्-जसे आम्ही जवळ जाऊ लागलो तस-तसे त्या हडळीचे सत्य स्वरूप पुढे येत होते. ती पांढऱ्या साडीतील हडळ कणाकणाने एका पांढऱ्या सिमेंटच्या खांबात परिवर्तीत होत जात होती. माझा भ्रम फिटला होता. भूताचं अस्तित्व संपलं होतं. मला भीतीचे कारण कळले होते. मी निर्धास्त झालो होतो. तेव्हा मला दूरदर्शन वरील एका जाहिरातीचा संदेश कळला होता की, ‘डर के आगे जीत है!’

मनोज बोबडे


शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

नारा

बंध येथे जागताना ठाम थारा पाहिजे
दो मनाची वाहणारी एक धारा पाहिजे
लग्न गाठी जोडल्या जर चालताना वाट ही
मी तुझा नि तूच माझी हाच नारा पाहिजे


मनोज  बोबडे... 'व्हीलचेअर'मधून...

काही श्लोक


मला लागला नाद मानव्यतेचा
गडे वाद सरला खुळ्या संचिताचा   
अता राहणे गोड साध्या ठिकाणी
सदा खोदणे आपुल्या सत्व खाण

नको भेद-भावा इथे स्थान देऊ
नको कोणत्याही अन्यायास साहू
नको रे अडू शब्दराशीमध्ये तू
रुचेना मन ते नको गीत गाऊ

कुणा हीन मानू नको सुद्न्य बा रे
इथे सर्व कच्चे जणांचे किनारे
कुणी आगळे नी कुणी वेगळाले
सदा माणसे शोधताती सहारे  
           
कुणी गुंतले गुंतले या ठिकाणी
कुणी धन्य  येथे कुणी त्या ठिकाणी
मजा वाटते हीन म्हणता कुणाला
रुचे साम्यता ही कुणाच्या मनाला 

-मनोज बोबडे...'वेध अम्बराचा' मधून 

वेगळेपणाचं वैशिष्ट्य

          सृजनात्मक प्रकृती कुणाला प्रिय नसते? ज्याला नसते, तो रसिक म्हणता येत नाही. त्याच-त्यापणात अडकून असणाऱ्या कृती रसिक मनाला डबक्यासारख्या भासत असतील तर नवल ते काय?  तिच्यासारखीच ती असणं म्हणजे तिच्या कृतीचं महात्म्य, तिचा गोडवा हा अप्रतिम असणं आहे. वेगळ्या सामर्थ्याची घडणच तिचं वेगळेपण टिकवून असते. मग तिच्या गुणाचं प्रमाण किती हा भाग अलाहिदा! स्वतंत्र अस्तित्व लेवून असलेलाच आविष्कार, डोळ्यांना, रसिक मनाला सुखावह वाटत असतो. कारण त्या निर्मितीकडे बघताना तो आधीच बघितल्याचा निरस भाव आपल्या लोचनी असत नाही. उलट त्याकडे बघताना एक चमत्कृतीपूर्ण -नजर आपली साथीदारीण झालेली असते. आणि हाच अचंबा आपल्याला उदात्त, उत्तम असा आनंद देणारा ठरतो. फक्त ती रसिकता व वेगळेपणाचं सामर्थ्यही उरी नांदायला हवं!
          डॉ. इकबालांचा एक 'शेर' आहे...
                           जम्हुर्हियत तर्ज  हुकुमत है यारो जिसमे
                            बंदो को गिना जाता है, तोला नाही जाता|

इकबालांनी असं जे म्हटलं आहे ते उगाच नव्हे! कोणत्याही प्रतिभेला तोलण्याची गरज ती काय? तिची स्वतंत्रपणे मापणी केली गेली पाहिजे !....
           हा प्रकार फक्त घडतो तो जनतेच्या राज्यामध्ये-लोकांच्या राज्यामध्ये! मक्तेदारांच्या वा 'तानाशहांच्या' राज्यात नाही.
           म्हणून हटके म्हणतात तो आविष्कार करणारा- हा स्वतंत्र गणतीच्या रांगेत उभा असतो. अनुसरणाऱ्यालाच तुलना प्राप्त होत असते. आणि तुलना म्हणजे प्रेरणेपासून फारकत घेणे होय.   याचा अर्थ प्रेरणा नाही म्हणजे खाद्य नाही, खाद्य नाही म्हणजे पोषण नाही, पोषण नाही म्हणजे शक्ती नाही, शक्ती नाही म्हणजे कृती नाही, कृती नाही म्हणजे आविष्कार नाही....आणि जिथे आविष्काराच नाही तिथे वेगळेपणाचा आनंद तो काय असणार? तेव्हा तुलनेमुळे एवढे जर नुकसान होत असेल तर खरेच तिची गरज आहे का?.....'नाही' हे उत्तर सुद्न्यांचे असेल!
           आपल्या अस्तित्वाला थारा मिळवून देणारी निर्मिती आपल्याकडून घडली तर आपण एक वेगळेच प्रतिभावंत म्हणून परीचयास येऊ!  तेव्हा आपली तुलना न होता गिणती होईल, एक प्रतिभावान म्हणून...कलानिर्माता म्हणून...एक श्रेष्ठ आविष्कारक म्हणून...
           आणि हे सामर्थ्य असेल आपल्याकडे असणाऱ्या हटके निर्मितीच्या ध्यासाचं !!!

-मनोज बोबडे

हिरवा प्रकाश

रंगीत हे मेघ | नभाच्या अंगणी |
ओलीचिंब गाणी | पावसाची ||

अफाट अनंत | धरणी आकाश |
हिरवा प्रकाश | जिथे-तिथे ||

आनंद सर्वत्र | कणकणवासी |
नाते हे प्रेमाशी | जुळलेले ||

निर्मळ, प्रेमळ | अंतरंग जे-जे |
मनाशी पाहिजे | माझ्या तेच ||

हिण तत्व सारे | प्रस्थापण्यासाठी |
करी उठाउठी | वीट त्याचा ||

माणूस म्हणोन | मनो-मनी नांदू |
काळजाला सांधू | माणसाच्या ||

होईल हिरवी | कंच दाट मने |
गाऊ चला गाणे | पावसाचे ||

-मनोज बोबडे

वर्षा ऋतू पर हिन्दी बालकविता

  प्रतीकात्मक इमेज वर्षा ऋतू वर्षा ऋतू आया है बारीश ने गीत गाया है नभ के आंगण मे देखो काली काली छाया है चल राजू चल पिंटू चल भिगते है पानी म...