शब्दांच्या बळे रंजनासह, विवेकी आनंद देण्याचा-घेण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न...आपल्याला आवडेल या अपेक्षेसह!!
सोमवार, २७ जानेवारी, २०१४
वऱ्हाड भाज्यांचे
लेबल:
बालकविता
बुधवार, २२ जानेवारी, २०१४
लक्षण विजय वीरांचे
नकोच धरणे इर्षा, मत्सर
पाहता यश इतरांचे
स्वतःस जिंकीत जाणे
हे लक्षण विजय वीरांचे ||
जिद् मुंगीची अंगी बाणून
गरुड नजर ती स्वतःस मानून
क्रमून कणकण अंतर खडतर
झिजवून काया सदा खरेतर
ध्येय गाठणे तयांचे ||
नसे कुणाशी तुलना आणिक
झपाटणे हे त्यांचे 'टानिक'
हवे मना ते धरण्यासाठी
मात स्वतःवर करण्यासाठी
धडपडणे ते करांचे ||
सदोदित ते मनास बोले
'तुझियासाठी अशक्य कुठले?
कर कर कर कर सुरुवात ती
जमेल तुजला हवी बात ती'
मंत्र-जाप हे शूरांचे ||
-मनोज बोबडे
पाहता यश इतरांचे
स्वतःस जिंकीत जाणे
हे लक्षण विजय वीरांचे ||
जिद् मुंगीची अंगी बाणून
गरुड नजर ती स्वतःस मानून
क्रमून कणकण अंतर खडतर
झिजवून काया सदा खरेतर
ध्येय गाठणे तयांचे ||
नसे कुणाशी तुलना आणिक
झपाटणे हे त्यांचे 'टानिक'
हवे मना ते धरण्यासाठी
मात स्वतःवर करण्यासाठी
धडपडणे ते करांचे ||
सदोदित ते मनास बोले
'तुझियासाठी अशक्य कुठले?
कर कर कर कर सुरुवात ती
जमेल तुजला हवी बात ती'
मंत्र-जाप हे शूरांचे ||
-मनोज बोबडे
याची सदस्यता घ्या:
पोस्ट (Atom)