पोस्ट्स

सप्टेंबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कृपा!

इमेज
रामेश्वर कालच नागपूरवरून गावाला परतला. दोन वर्षापासून करत आलेल्या कामाला कायमचा सलाम ठोकून तो घरी आला होता. चार-सहा दिवसापूर्वी घरच्यांनी त्याला कळविले होते, की ‘एका नावाजलेल्या कंपनीकडून तुला नोकरीचा 'कॉल' आला आहे.’ चार वर्षापासून ‘इंजिनियरिंगचे’ शिक्षण होऊन अंशकालीन काम करीत असलेल्या रामेश्वरला 'कॉल' आल्याचे ऐकल्यापासून आनंदाला पारावार उरला नव्हता. त्याला आता नोकरीचे वेध लागले होते. त्याला वाटत होते ‘हा कॉल येणे म्हणजे, बाबा म्हणतात तशी आपल्या गुरुचीच कृपा असावी!’        श्री शास्त्री महाराज हे रामेश्वरच्या कुटुंबियाचे गुरु. हे चलाख कुटूंब म्हणजे या शास्त्री महाराजांचे परम भक्त. यांच्या घरी कोणत्याही यशासाठी, भरभराटीसाठी कारणीभूत असते ती या महाराजांचीच कृपा! आताही 'कॉल' येणे ही त्या महाराजांचीच कृपा होती.        शिववर्घन हा रामेश्वरचा जीवलग मित्र. तो या महाराजांच्या कृपेविषयी रामेश्वरला एकदा म्हणाला होता, “ रामेश्वर, तुमचे जेव्हा भले होते तेव्हा या महाराजांची कृपा असते, असे तू म्हणतोस, मग मागे एकदा तुमच्या शेतीच्या प्रकरणात दोन एकर शेती विकायला लागून तु

आत्म्याचे माहात्म्य ?

प्रकृती न्याय बजावत चालली आहे. पाल भिंतीवर किड्यांच्या शोधात फिरत आहे. आत्ताच तिने किडा पकडलाय, तो एवढा मोठा आहे, की तिला अजूनपर्यंत खाता आलेला नाही. किड्याचा जीवही अजून कायम. सगळेच जगण्यासाठी धडपडतात. ती पाल किडा खाऊन जगू पाहतेय, किडा तिच्या तोंडातून सुटून जगू पाहतोय, आणि इकडे मानसीक मरगळ झटकून लिखाणाद्वारे जगण्याचा माझा प्रयत्न चाललाय. शेवटी भिंतीवरील किडा हरला, पाल जिकली. एकाचं अस्तित्व संपून दुसऱ्यात विलीन झालं. या पालीच्या व किड्याच्या दृष्यास् बघून माझ्या मनात आत्म्यविषयीचे काही प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न प्रत्येक विवेकी मनाला विचार करायला लावणारे आहेत. वरील दृष्यामध्ये पालीनं किड्याला गिळलं मग त्या किड्याच्या आत्म्याच काय झालं? किड्याच्या देहाप्रमाणे त्याचा आत्माही त्या पालीच्या पोटात विलीन झाला आसवा का? की स्वर्गात वा नरकात गेला? की कुठे भूत बनून भटकू लागला? मान्यतेप्रमाणे परमात्म्याला प्राप्त तर झाला नसावा? धर्मग्रंध, रुढी, मान्यता तर म्हणते, आत्मा पुनर्जन्म घेतो. की तसा काही प्रकार आहे? हे आणि असे कित्त्येक तत्सम प्रश्न आत्म्या संदर्भात संभ्रम निर्माण करतात.      

प्रकृतीची करणी

कार्य येथे घडते ते कारणांच्यामुळे वाढे झाड, घेत उन्ह, पाणी पीत मुळे संयोगाने नवल ते उदयास येते शब्दलयासवे गोड गाणे जन्म घेते सृष्टी हीच सर्वार्थाने सकाळाशी छान प्रकृतीची करणी ती असते महान|| सफलता लाभते ती नियोजनातून कधी यश धावुनी ये नेणीवेमधून जीवनाचे सुख सारे धडपडीमध्ये विश्वासाने कृती करा रसना ती वदे कधि नच वास्तवाचे विसरावे भान प्रकृतीची करणी ती असते महान|| 'कोण देते?' खरे तर सवाल हा खुळा अन्याहून संवेदेने जगतो आंधळा रीत हीच चालताना क्रमते ही वाट क्षमतेच्या बळावर जगण्याचा थाट अगनीचे धूर हेच ठरे अनुमान प्रकृतीची करणी ती असते महान|| अद्भूत घडे त्यास म्हणे चमत्कार अंधपणामुळे दिव्य ठरे हा प्रकार फाटला तो पडदा की उघडे झापड उंदीरच निघे तिथे खोदता पहाड डोळसाला प्रयोग हे प्रत्यक्ष प्रमाण प्रकृतीची करणी ती असते महान|| मनोज बोबडे 

विचारधन

....ही आपली खूप मोठी चुक आहे की, धर्माला आपण नैतिकतेचा समानार्थी करून बसलो, या पूर्णतः भिन्न मान्यता असूनही! धर्म हा आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक, ईश्वर, अवतार, यज्ञ, कर्मकांड, पाप-पुण्य, स्पृश्य-अस्पृश्य आदि ज्या धारणा आहेत त्यावर अवलंबून आहे. आणि नैतिकता ही सत्य आणि प्रेम यावर आधारित आहे. ज्याचे उद्दिष्ट समाजात प्रामाणिकता, कर्तव्यपरायणता, सहानुभूती, करूणा, बंधुता, सभ्यता, नागरिकता, देशप्रेम, विश्वबंधुत्व, न्याय, शिष्टाचार इत्यादींच्या मार्फत समाजात शांती, सुव्यवस्था आणि सद्भावना प्रस्थापित करून विज्ञान, कला आणि साहित्याची सेवा करत मानव जातीस सुखी, समृध्द व समाधानी करणे आहे.....नैतिकतेचे दुसरे नाव मानवता हे आहे! (प्रयागद्त्त पंत, ‘धर्म बनाम नैतिकता’, सरिता, (११)१९७१/पृष्ठ ७३) चा मराठी अनुवाद..... ............देशाच्या भूतकाळातून वर्तमान प्रभावित झाल्याशिवाय राहूच शकत नाही, आणि वर्तमान भविष्याला प्रभावित केल्याशिवाय सोडत नाही.       हिंदूंच्या अभिजन वर्गाची इतिहासाप्रती वेगळ्याच (अजीब) प्रकारची धारणा राहिलेली आहे. ते नेहमीच इतिहासाला आहे त्याहून निराळ्या रुपात पुढे