सगळेच मनाचे साथी


सगळेच मनाचे साथी
मी कुणास ठेऊ नावे
मज उगा दोष दे त्यांना
मी कशास शोषित जावे

ते गावे गातच जावे
समतेचे गीते सुहाणे
प्रेमाची फेड प्रेमाने
नच मोल ठेवती नाणे

ही भोगून घ्यावी सारी
सुख-दुःखे आळीपाळी
सप्रेमच जगणे आहे
दुनियेची तऱ्हा निराळी

हिरवळ नात्यची अन्
सुमनापारी मैत्री गोड
दरवळेल जपता सारा
हर्षाचा गंध अजोड

मिठास रसनेला ती
अंतरात मद भरलेला
तू अशा  नीती साठी रे
हा कशास देह झीजविला

न्यायाची धरणे बुज
साहणे न अन्यायाला
समतेचे देणे घेणे
हे सौख्यच दे हृदयाला

तू ये हृदयाशी माझ्या
कर बातचीत स्नेहाची
भरभरून देऊ प्रीती
करू दुनिया मानवतेची

           मनोज बोबडे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऐक जरा साजणे...

प्रबोधन गीत

हे असं आहे तर...