बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

अभंग.

 

रुपकात्मक 


आशयात खोल


आशयात खोल, चला रे डुंबूया l 

 समजून घ्याया, सार सारे ll 


 अर्भकाचे हास्य, किती निरागस l 

 त्याचा मनी ध्यास, बाळगावा ll


 संसाराचा व्याप, अनुदिन ताप l

 सुगंधी आलाप, ऐकू कधी ll


 सावलीची माया, अगाध परंतु l

 उन्हाचाही हेतू, हीन कैसा? ll


 कळले का कोणा, जाता हरिद्वारी l

 प्रसंगाच्या उरी, काय आहे?ll


 असो दीन कोणी, जगताचा शाह l

 जगण्याचा मोह, सोडू नये ll


-मनोज बोबडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभंग.

  रुपकात्मक  आशयात खोल आशयात खोल, चला रे डुंबूया l   समजून घ्याया, सार सारे ll   अर्भकाचे हास्य, किती निरागस l   त्याचा मनी ध्यास, बाळगावा l...