मंगळवार, २९ जुलै, २०२५

 

प्रतिकात्मक इमेज 


प्रेमाचा वाटा


 जांभळे ही लागलीत ढगाच्या जगात

 दूरच्या देशाचा बघा असा हा प्रघात 


 नको राखू अचंबा तू मनाच्या मातीत

 दूरचे म्हणून गोड करू नको घात 


 प्रेममय जगी तेच हवे हवे वाटे

 भेदभावनेच्या जागी दिसतात काटे


 प्रेम हाच देव, गुरू प्रेम भक्तिभाव

 कशास तू घेतो परलोकासाठी धाव


 जिथे सर्व काळ असे प्रेमाची ददात 

 तिथे दिव्य ठरते ती नुसतीच जात


 ओलाव्याने मातीमध्ये अंकुरतो जीव

 तसलाच प्राणमय प्रेमाचा प्रभाव


 म्हणूनिच प्रेमाचा द्या पसाभर वाटा

 मग मला हवे तसे काळजाने लुटा!


-मनोज बोबडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतीकात्मक     चांद पाहिला चांद पाहिला ग बाई चांद पाहिला त्या भाबड्या रुपावरी मी जीव वाहिला ll ती चाल हळू मंद कशी मोहवी मना  ठाव घेत मम जीव...