![]() |
प्रतीकात्मक |
त्या भाबड्या रुपावरी मी जीव वाहिला ll
ती चाल हळू मंद कशी मोहवी मना
ठाव घेत मम जीवाचा येत पाहुणा
स्वागतास मी तयाच्या छंद गाईला
चांद पाहिला ग बाई चांद पाहिला ll
मनात कळेना हा कसा गंध वाहतो
असाच का हो मधु प्रेम गंध राहतो
याहो बागेतून विचारून जाईला
चांद पाहिला ग बाई चांद पाहिला ll
आज वाटते नवे नवे हे चांदणे
नवेपणात रंगले हे आज नांदणे
येत कसा भाव मनातील घाईला
चांद पाहिला ग बाई चांद पाहिला ll
कळेना आज गात्र गात्र का वेडावले
खास हेच त्या शशीने प्राण चोरले
जीव गड्या आज हा माझा न राहिला
चांद पाहिला ग बाई चांद पाहिला ll
-मनोज बोबडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा