शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

आईचे विश्व

बघ बघ बाळा
वाजे खूळ-खुळा

असा नको हसू
गोड-गोड दिसू

लागेल नजर
माझीच सत्वर

टिळा काळा काळा
गालाला लावला

मिरची जाळली
नजर पळाली

-आईचाच भ्रम
भ्रमासाठी श्रम

नसले ते काही
करतच राही

जग कल्पनेचे
उभे करायाचे

असली ती आई
विश्व सुख घेई

-मनोज बोबडे

विवेक

 विचारधन  रुपकात्मक  'म्हणे अध्यात्म हा एक ज्ञानमार्ग आहे, वृत्ती मार्ग नव्हे. ज्ञानमार्ग म्हणजे काय याचा थोडा खुलासा कराल का?.....एखाद्...